Last Updated: Wednesday, February 19, 2014, 15:49
www.24taas.com, झी मीडिया, पुणेशिरूर मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवदत्त निकम यांच्या नावाची घोषणा केली आहे.
देवदत्त निकम हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदार संघातून देवदत्त निकम हे राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी उमेदवार असतील, अशी घोषणा अजित पवारांनी आज जुन्नरमध्ये केली आहे.
या मतदारसंघात मागील दोन वेळेला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, हे शिवसेनेकडुन निवडून आल्याने पक्षाने गेल्या काही महिन्यांपुर्वीच त्यांना तिसरयांदा उमेदवारी जाहिर केली असुन, ते त्यादॄष्टीने तयारीलादेखील लागले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 19, 2014, 15:45