‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडलाDead body found in Nira river out of four Missing in

‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडला

‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडला
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातल्या गायब झालेल्या तरुणांपैकी चिंतन बुच या तरुणाचा निरा नदीत मृतदेह सापडलाय. चार दिवसांपूर्वी पुण्याहून निघालेले चार तरुण अचानक बेपत्ता झाले होते. त्यात एका तरुणीचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. इतर तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

प्रणव लेले, चिंतन बुच, साहिल कुरेशी आणि श्रृतिका चंदवाणी अशी चौघांची नावं आहेत. श्रृतिका ही मूळची कोल्हापूरची असून तिला कोल्हापुरात सोडून तीन मित्र कर्नाटकातील गोकर्णला जाणार होते.

पुण्यातल्या एका जाहिरात कंपनीत हे चौघंही काम करतात. दिवाळीची सुट्टी असल्यानं त्यांनी देवदर्शनाचा प्लॅन केला होता. मात्र पाच दिवसांनंतरही ते कुठं आहेत, याचा शोध लागत नाहीये.

सातारा जिल्ह्यातील कापूरहोळ हे त्यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्वांचे मोबाईल फोन स्वीच ऑफ झाल्यानं प्रणव लेले यांचे वडील अशोक लेले यांनी पोलिसांकडं तक्रार दाखल केली. या बेपत्ता झालेल्या चार तरुणांचा अपघात अथवा अपहरण झालं असण्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावलीय. या घटनेमागे प्रथमदर्शनी वेगळंच कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.

दरम्यान पुण्यासह, सातारा तसंच कोल्हापूरचे पोलीस विविध यंत्रणांच्या माध्यमातून बेपत्ता तरुणांचा शोध घेतायत. खंबाटकी घाट, वरंध घाट तसंच निरा देवधर परिसरात शोधकार्य सुरूय. त्यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर करण्यात येतोय. याकामी पुणे पोलीस आज पाचगणी - महाबळेश्वहरकडे रवाना झालेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 12:59


comments powered by Disqus