‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे? Police Found Car of missing Pune professionals, One dead

‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?

‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागलाय. नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली ही गाडी सापडलीय.

क्रेनच्या सहाय्यानं ही गाडीवर काढण्यात आलीय. स्थानिक मच्छिमार आणि एनडीआरएफचे जवान ही शोध मोहीम करत होते. त्यांच्या शोध मोहिमेला यश येत असल्याचं दिसतंय.

प्रणव लेले, चिंतन बुच, साहिल कुरेशी आणि श्रृतिका चंदवाणी अशी या चौघांची नावं आहेत. श्रृतिका ही मूळची कोल्हापूरची असून तिला कोल्हापुरात सोडून तीन मित्र कर्नाटकातील गोकर्णला जाणार होते. पुण्यातल्या एका जाहिरात कंपनीत हे चौघंही काम करतात. दिवाळीची सुट्टी असल्यानं त्यांनी देवदर्शनाचा प्लॅन केला होता. मात्र पाच दिवसांनंतरही ते कुठं आहेत, याचा शोध लागत नव्हता.

मात्र काल चार मित्रांपैकी एक असणाऱ्या चिंतन बुचचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात आढळून आला होता. त्यानंतर इतर तिघांचा शोध सुरू होता. मात्र आता गाडीचा शोध लागला असून इतर तिघांचाही शोध सुरु आहे. शिवाय हा घात की अपघात, याचाही तपास घेतला जातोय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, November 7, 2013, 13:10


comments powered by Disqus