डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस साजरा, Deccan Queen celebrating 85th birthday

डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस साजरा

डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस  साजरा
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

देशातील पहिली वहिली आरामदायी रेल्वे डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. दख्खन की राणी अशी ओळख असणारी ही गाडी मुंबई-पुणे या दोन शहरांच्या प्रगतीत महत्त्वाचा दुवा ठरली आहे.

1 जून 1930 पासून आतापर्यंत अविरत धावणा-या या गाडीचा अनेकदा कायापालटही झाला. आयएसओ 9001-2000 प्रमाणपत्र मिळवणारी ही भारतातील केवळ दुसरी रेल्वे आहे.

सद्यस्थितीत 17 डब्यांसह आपला प्रवास करणा-या या डेक्कन क्वीनला 4 एसी चेअर कार, एक डायनिंग कार, 10 सेकंड क्लास चेअर कारसह दोन सेकंड क्लास कम ब्रेक वॅन जोडलेल्या आहेत.

1 जून 1930 ला पुणे – मुंबई दरम्यान पहिल्यांदा धावली. अतिशय वेळेत धावणारी ट्रेन म्हणून हिचा नावलौकिक आहे.
ट्रेनमध्ये रेस्टॉरंट असलेली ही भारतातील एकमेव ट्रेन आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 1, 2014, 17:32


comments powered by Disqus