Last Updated: Saturday, June 1, 2013, 11:39
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुणे मुंबई दरम्यान धावणारी दख्खनची राणी ८३ वर्षांची झाली आहे. पुणे तसेच मुंबईच्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचा वाढदिवस आज पुणे स्टेशनवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..
डेक्कन क्वीननं आज ८३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.. त्यामुळं हा वाढदिवस ८३ किलोचा केक कापून साजरा करण्यात आला.. प्रवाशांनी ट्रेनला हार तसंच फुलांनी सजवलं होतं.. त्यानंतर डेक्कन क्वीनला शुभेच्छा देत केक कापण्यात आला..
पुणे-मुंबई असा रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डेक्कन क्वीन म्हणजे हक्काची गाडी. रोजच्या प्रवासात आपली सुख:दुख याच गाडीत शेअर केली जातात. म्हणूनच हीच डेक्कन क्वीन एक प्रकारचं घर झालेलं आहे. आणि त्यामुळेच प्रवाशांनी आपल्या या लाडक्या राणीचा वाढदिवसही तिच्या दिमाखाला साजेल असाच साजरा केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 1, 2013, 11:27