राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं आव्हान Devendra Fadanvis challenges Raj Thackeray

राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं आव्हान

राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं आव्हान
www.24taas.com, झी मीडिया, सांगली

`पुन्हा माझ्याशी न बोलता परस्पर महायुतीमधील माझ्या समावेशाबद्दल काही बोललात तर तुमची गुपितं जाहीर करेन` असं म्हणणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं आहे.

काँग्रेसविरोधी मतांची विभागणी टळावी म्हणून भाजप, शिवसेना, रिपाइं या युतीबरोबरच समविचारी पक्षांना सामावण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही विशालयुतीचा विचार करत आहोत असा जर कुणाला भ्रम असेल, तर त्यांची आम्ही वाट पाहात बसणार नाही. आमची गुपितं खुशाल जाहीर करावीत. असं बेधडक आव्हान देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना दिलं आहे.

भाजप-शिवसेना-रिपाइं ही महायुती आपल्या बळावर राज्यात सरकार स्थापन करू शकेल, असा विश्वासही फडणवीसांनी दर्शवला. दरम्यान, मनसेच्या विषयावर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही असं उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत स्पष्ट केलं. भाजपासोबत आमची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. त्यामुळे युतीच्या विस्ताराचा निर्णय आम्ही परस्पर सहमतीनं घेऊ असं उद्धव यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013, 15:46


comments powered by Disqus