दिवाळीचं काऊंटडाऊन सुरू... किल्ले झाले सज्ज!Diwali Countdown Start, Children make Forts for Diwali

दिवाळीचं काऊंटडाऊन सुरू... किल्ले झाले सज्ज!

दिवाळीचं काऊंटडाऊन सुरू... किल्ले झाले सज्ज!
www.24taas.com , झी मीडिया, कोल्हापूर

दिवाळीत किल्ला बनविणे हे लहानग्यांचे आवडीचे काम... मातीत खेळत धमाल मस्ती करत दिवाळीच्या आधी किल्ले तयार व्हावेत यासाठी बालचमुची धडपड सध्या सगळीकडचं सुरु आहे. अशीच धडपत सध्या कोल्हापूर शहरातील पेठा पेठात पहायला मिळत आहे. धगधगत्या इतीहासाची साक्ष देणाऱ्या शिवरायांचे रायगड, प्रतापगड, रागंणा,पन्हाळगड असे अनेक किल्ले लवकर उभे राहावते यासाठी सगळे मावळे कामाला लागले आहेत.

दिवाळी आली की सगळ्याचं बाल चमूंना वेध लागतात ते किल्ले बांधणीचे. शाळेला सुट्टी मिळाल्यामुळं लहान मुले दगड, माती आणि विटा जमवून किल्ले बांधणीला लागतात. या बालचमूंच्या गोटात शिवाजी महाराजांच्या काळातील लढाया, मावळ्यांच्या पराक्रमांची गाथा याविषयी मोठं कुतूहल असतं. या उत्सुकतेतूनच गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत मुलांची फौज शिवकाळात रममाण होते. अंगावरील कपडे घाण होण्याची परवा न करता गल्ली बोळात हे लहान मावळे किल्ले करण्यात रमलेले सध्या दिसतायत.

या बाल कलाकारांना मोठ्यांचं मार्गदर्शनही मिळतंय. स्थापत्य शास्त्रातले उद्याची दिग्गज मंडळींच्या खुणा हे किल्ले पाहताना होतायत. केवळ बच्चे कंपनी नाही तर अनेक तरुण मंडळीही सध्या किल्ले उभारणीत दंग आहेत. शहरातल्या आबाल वृद्धांची सूरु असलेल्या या लगबगीमुळं कोल्हापुरात खऱ्या अर्थानं दिवाळीचं काऊंटडाऊन सुरु झालंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


पाहा व्हि़डिओ


First Published: Thursday, October 31, 2013, 09:05


comments powered by Disqus