डॉ. दाभोलकर हत्याकांड : कोण आहे हा मन्या नागोरी?, dr dabholkar murder : who is manya nagori?

डॉ. दाभोलकर हत्याकांड : कोण आहे हा मन्या नागोरी?

डॉ. दाभोलकर हत्याकांड : कोण आहे हा मन्या नागोरी?
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

इचलकरंजीतील अट्टल गुन्हेगार मनिष रामविलास नागोरी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना शस्र पुरविल्याचा दाट संशय पुणे पोलिसांना आहे. मनिष नागोरीवर बेकायदेशीर शस्त्रे विकल्याप्रकरणी आणि खून, खंडणीसारख्या अनेक प्रकरणांत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.

कोण आहे हा मन्या उर्फ मनिष नागोरी आणि काय आहे याची पार्श्वभूमी... पाहुयात...
मन्या ऊर्फ मनीष रामविलास नोगोरी या खंडणी प्रकरणात पुणे पोलीसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरविल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका सामान्य कापड व्यापाऱ्याचा तो मुलगा... दोन वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. त्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात त्याचं नावं पुढ येत गेलं. जयसिंगपूर इथं चार महिन्यापूर्वी गुंड भरत त्यागी खून प्रकरणात वापरलेले पिस्तुल नागोरीनं पुरविल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. मनिषनं यापूर्वी कोल्हापूर जिल्हयात आणि जिल्हाबाहेर अनेकांना बेकायदेशिरपणे पिस्तुल आणि एअरगन विकल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय. कोल्हापूर पोलिसांनी मन्या ऊर्फ मनिष नागोरीकडे तपास करत आतापर्यत चक्क विक्री केलेले १७ पिस्तुल आणि एक एअरगन हस्तगत केलीय.

इचलकरंजी पोलिसांनी मनिषकडून ५ पिस्तुल ५ राउंड आणि एक एअरगन जप्त केलेत. शिवाजीनगर पोलिसांनी ४ पिस्तूल आणि ९ राऊंड, हातकणंगले पोलिसांनी १ पिस्तूल, २ राऊंड, जयसिंगपूर पोलिसांनी ६ पिस्तुल आणि ७ राऊंड तर गांधीनगर पोलिसांनी १ पिस्तूल जप्त केलंय.

कोल्हापूर पोलिसांनी ही हत्यारं जप्त करुन मनिष नागोरी यांच्यावर भारतीय हत्यारकायद्यानुसार विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केलीय. त्याचबरोबर दोन खुन्याच्या गुन्ह्याप्रकरणी नागोरिवर गुन्हे दाखल आहेत. आता दाभोलकरांच्या हत्येप्रकरणात त्याचा कितपत सहभाग आहे, हे पुणे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल.


व्हिडिओ पाहा -




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 09:49


comments powered by Disqus