Last Updated: Tuesday, July 30, 2013, 17:26
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी- चिंचवडपिंपरी चिंचवड मध्ये महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉक्टर अनिल रॉय यांनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजलीय. रॉय यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी महिला नगरसेविकांनी केलीय. रॉय यांनी राजकारण्यांविरुद्धची ही वक्तव्य फेसबुकवर पोस्ट केलीयत.
पिंपरी चिंचवडचे प्रभारी आरोग्य विभाग प्रमुख अनिल रॉय यांना पिंपरी-चिंचवडमधल्या राजकारण्यांचा भलताच राग आलाय. त्यांचा हा राग त्यांनी फेसबुक वर व्यक्त केलाय. त्यांच्या मते . राजकारण्यांनी जर तुम्हाला मदत करण्यासाठी बोलावलं, तर जाऊ नका, राजकीय लोक सडलेल्या मनोवृत्तीचे असतात. तुम्हाला लाज वाटेल असं ते वागतात. पैसे दिले तरच ते तुमचं काम करतात. नाही तर राजकीय वजन वापरून तुमची पदोन्नती थांबवतात. तुम्ही कष्टानं उभं केलेलं तुमचं करियर ते बरबाद करतील. तुमच्याकड पैसे मागणं हा त्यांचा अधिकार आहे, असं ते समजतात. राजकारणी प्रचंड लोभी आहेत. नगरसेविकांचे पती नरकात जातील
आता राजकारण्यांना अशा पद्धतीनं लाखोली वाहिल्यानंतर पिम्परीतल्या राजकारण्यांचा पारा चांगलाच चढलाय. फेसबुक वर राजकारण्यांविरोधात गरळ ओकल्यानंतर रॉय आता फोन ही उचलत नाहीत. मुळात रॉय यांच्याकड आरोग्य विभाग प्रमुख म्हणून प्रभारी कार्यभार देण्यात आलाय. त्या पदावर त्यांची नियुक्ती होत नसल्यामुळं रॉय संतापल्याचा आरोप केला जातोय. त्यातच रॉय यांचं अनधिकृत बांधकाम असल्याचंही स्पष्ट झालं होतं. नगरसेवकांचा दबाव लक्षात गेता आयुक्तांना काहीतरी पावलं उचलणं गरजेचं झालंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 30, 2013, 17:26