तृतीयपंथी, देहविक्रेत्या स्त्रियांचं अधिवेशन Eunuchs & sex workers Assemble

तृतीयपंथी, देहविक्रेत्या स्त्रियांचं अधिवेशन

तृतीयपंथी, देहविक्रेत्या स्त्रियांचं अधिवेशन
www.24taas.com, पिंपरी

शरीर विक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी हे समाजातील उपेक्षित घटक. समाजाचा एक भाग असूनही समाजात त्यांना वागणूक अत्यंत अपमानास्पद मिळत असते. यासंदर्भात या वर्गातील लोकांसाठी एक अधिवेशन आयोजित केलं आहे.

‘आम्हीच आमच्या जीवनाचे शिल्पकार’ हे उद्दिष्ट ठेवून पिंपरीमध्ये तृतीयपंथी, शरीर विक्रय करणा-या महिलांचं दोन दिवसीय अधिवेशन पिम्परीत आयोजित करण्यात आलं. जीवनज्योत या संस्थेनं त्यासाठी पुढाकार घेतला होता.

या अधिवेशनात राज्याभरातले तृतीय पंथी, शरीर विक्रय करणा-या महिलांनी सहभाग नोंदवलाय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यावं, सर्व हक्क मिळावे या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय..

First Published: Wednesday, December 5, 2012, 19:23


comments powered by Disqus