Last Updated: Thursday, April 25, 2013, 12:20
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूरआज हनुमान जयंती श्रीरामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम,त्याचा सेवक श्री हनुमान हा चिरंजीव दासोत्तम, सर्वशक्तीमान, महाधैर्यवान, संगीतशास्त्राचा प्रवर्तक... जीवनाला परीपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तीमंत प्रतिक म्हणजे रामभक्त हनुमान...
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाल्याचं बोललं जातं. आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. देशभरात ठिकठिकाणी रामनवमीनंतर हनुमान जयंतीही तितक्याच उत्साहात साजरी केली जातेय. सोलापूरातल्या बाळीवेस इथं उत्तराभिमुख हनुमान मंदिर आहे.
तिथं आज पहाटेपासूनच विविध अनुष्ठान, तसंच धार्मिक विधींसह हनुमान जयंती साजरी होतेय. तर आज हनुमान जयंती आणि चंद्रग्रहण असाही योग जुळून आलाय. 2013 या वर्षातलं हे पहिलंच चंद्रग्रहण आहे.
First Published: Thursday, April 25, 2013, 12:20