महिलेच्या डोक्यात दगड घालून दागिने लंपास, Help oneself to the stone head of the woman and jewelry

महिलेच्या डोक्यात दगड घालून दागिने लंपास

महिलेच्या डोक्यात दगड घालून दागिने लंपास
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

शॉर्टकट पद्धतीनं पैसे कमावण्याच्या मागं लागल्यानं दिवसेंदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. अशीच एक घटना हडपसर या ठिकाणी घडली आहे. हडपसर इथल्या टकलेनगर इथं शेतात महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या अंगावरील सहा तोळ्याचे दागिने लपास केले आहे. ही घटना बुधवारी हडपसरमध्ये घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हरुबाई नारायण घुले वय वर्ष ६० राहणार हडपसर टकलेनगर मांजरी असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणामुळं दिगंबर नारायण घुले यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे. हा खून चोरीच्या उद्देशानं झाला की इतर कारणामुळं झाला आहे याचा शोध पोलीस घेत आहे.

दिगंबर घुले यांनी पोलिसांना दिलेल्या महितीनुसार, हरुबाई घुले या मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घरी होत्या. त्यावेळी बारा ते पंधरा वयाच्या मुलानं त्यांना घरी येऊन `तुमच्या शेतात गाय शिरली आहे` असं सांगितलं. त्यामुळं त्या गाय पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कोणीतरी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि नायलॉनच्या दोरीनं त्यांचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना भयंकर जखमी केलं आणि त्यांच्या अंगावरील सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र, पोत, बोरमाळ आणि कानातील कुडय़ा असं एकूण १ लाख १५ हजार रुपयांचे दागिने लपास केले.
या घटनेनंतर त्या जखमी महिला शेतातच बेशुद्ध अवस्थेत टाकून आरोपी फरार झाले. बराच वेळ झाला तरी घरी न परतल्यामुळं नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरू केली. तेव्हा त्यांना शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत त्या आढळल्या. त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली होती. त्यांना त्यावेळी लगेचच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी सांगितलं की, चोरीच्या उद्देशानं त्यांना मारण्यात आलं का दुसऱ्या कोणत्या अन्य कारणामुळं त्यांना मारलं, हे अद्याप सांगू शकत नाही. कारण की, त्यांच्या हातात चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगडय़ा मिळाल्या आहेत, याबाबत पोलीस तपास करत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 20:23


comments powered by Disqus