सुशीलकुमार शिंदेंच्या गावात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक, Helping Nakshalwadi in solapur

गृहमंत्र्यांच्या गावात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक

गृहमंत्र्यांच्या गावात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघातून दहशतवाद्यांना मदत करणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दहशतवाद्यांचे जाळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सोलापुरात दोघांना अटक करण्यात आल्याने याला दुजोरा मिळत आहे.

सोलापुरात दहशतवाद्यांना मदत करणा-या दोघांना अटक करण्यात आलेय. एटीएस, महाराष्ट्र एटीएस आणि सोलापूर क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलीय. या आरोपींकडून स्फोटंकं आणि पिस्तुल जप्त करण्यात आलीत. खांडवा जेल मधून फरार झालेल्या अबू फजलसह सहा आरोपींना जेल तोडून फरार होण्यास मदत केल्याच्या आरोपावरून सोलापूरच्या पछा पेठ आणि विडी घरकुल परिसरातून कोम्बिग ऑपरेशन करून दोघांना अटक करण्यात आलीय.

या कारवाईमुळे गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात दहशतवाद्यांचा स्लीपर सेल कार्यरत आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात येतेय. तसेच महाराष्ट्रात दहशतवाद्यांनी पुन्हा आपला अड्डा सुरू करण्यासाठी हालचाली केल्या असल्याचे बोलले जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 12:54


comments powered by Disqus