Last Updated: Wednesday, October 10, 2012, 20:27
www.24taas.com, पिंपर-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडालीये. ग्राहकाच्या मागणीनुसार कॉलगर्ल पुरविणा-या टोळीला पिंपरी पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अटक केली.
परराज्यातील कॉल गर्ल्सच्या मदतीनं हे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविलं जात होतं. याप्रकरणी पोलिसांनी सहा दलालांसह नऊ मुलींना ताब्यात घेतलयं. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. या मुलींपैकी दोन मुली स्थानिक आहेत. तर बाकीच्या मुंबई आणि परराज्यातील आहेत.
एखाद्या ठिकाणी मुलींना घेऊन कार उभी करायची आणि ग्राहकांचा फोन आला की मुलींना घेऊन कार थेट ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊन मुलींना त्याठिकाणी सोडायचं. अशी या टोळीच्या कामाची पद्धत होती.
First Published: Wednesday, October 10, 2012, 20:27