पुण्यात आयटी इंजिनियर्सची हुक्का पार्टी, ९ तरुणींचा समावेश, IT engineers hookka party in Pune

पुण्यात आयटी इंजिनियर्सची हुक्का पार्टी, ९ तरुणींचा समावेश

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी

पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या हॉटेल टीम लूकमध्ये हुक्का पार्टी करणा-या आय.टी. कंपनीच्या ३१ कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.यामध्ये ९ तरुणींचाही समावेश आहे. पहाटेची गस्त सुरु असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अधारे ही कारवाई करण्यात आली.

या सर्वांनी नशा केल्याचं वैद्यकीय चाचणीत समोर आलंय. मात्र ज्या हॉटेल लूकमध्ये ही पार्टी सुरु होती त्या हॉटेलचा मालक देवेंद्र सचदेव अजुनही फरार असून त्याचा शोध सुरु आहे.पुणे आणि जवळपासच्या परिसरात होणा-या हुक्का पार्टीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा समोर आलाय.

पिंपळे सौदागर परिसरातील टीम लकलक या हॉटेलवर रात्री सव्वाअकरा सुमारास छापा टाकण्यात आला. हॉटेलच्या तीन व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. तसेच काही जण आयटी इंजिनियर्स आहेत. या सर्वांना पिंपरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Sunday, February 2, 2014, 18:39


comments powered by Disqus