अण्णांच्या उपोषणाला आशेचा एकच ‘किरण’!, kiran bedi will join anna hazare for agitation

अण्णांच्या उपोषणाला आशेचा एकच ‘किरण’!

अण्णांच्या उपोषणाला आशेचा एकच ‘किरण’!

www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी

अण्णांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत किरण बेदीही येत्या शनिवारपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत.

जनलोकपाल बिलासाठी अण्णांनी पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू केलंय. सरकार जनलोकपाल विधेयक संमत करण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप बेदींनी केलाय.

दुसरीकडे, जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीमध्ये आमरण उपोषण केलं असताना या अधुऱ्या लढाईत सहभागी होण्याऐवजी अरविंद केजरीवालांचं दिल्लीत जल्लोषात सेलिब्रेशन सुरु असल्याचं चित्र दिसतंय. गुरूच्या प्राणांची बाजी लागली असताना, चेल्याला ही अवदसा आठवलीय, अशी प्रतिक्रिया त्यावर व्यक्त होतेय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 11, 2013, 18:23


comments powered by Disqus