Last Updated: Saturday, December 7, 2013, 22:42
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबा डोंगरावर असताना सगळ्याचं लक्ष वेधून घेणारा सुंदर हत्ती सध्या वारणा उद्योग समुहाकडे देखभालीसाठी आहे. मात्र या हत्तीला मारहाण होत असल्याचं उघड झालंय. या हत्तीला अभयारण्यात सोडून देण्यात यावं अशी मागणी पेटा या संस्थेने केलीय.
हत्तीला मारहाण होत असल्याची तक्रार करत काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वन्यजीव खात्याविरोधात पेटाने खटला दाखल केला होता. यापुर्वी वनमंत्री पतंगराव कदम यांनी सुंदर हत्तीला मुक्त करावा असा आदेश दिला असतानाही त्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही असंही पेटाचं म्हणणं आहे.
१४ वर्षाच्या तरुण हत्तीली अभयारण्यात सोडण्यात यावं अशी वारंवार मागणी करुनही त्याकडं दुर्लक्ष का केलं जातय असा प्रश्न उपस्थीत झालाय. दरम्यान सुंदर हत्तीला झालेल्या मारहाण प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहि्ती वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिलीय. तसंच दोषींवर कडक कारवाईची ग्वाही त्यांनी दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, December 7, 2013, 22:42