अखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:45

सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.

जगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले

Last Updated: Sunday, May 18, 2014, 19:40

जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.

उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!

Last Updated: Saturday, May 3, 2014, 16:31

उष्माघातानं चंद्रपूरात पहिला बळी घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा उश्माघातानं मृत्यू झालाय.

महिमाचा असाही `महिमा`, शेणापासून बनवला कागद!

Last Updated: Sunday, March 9, 2014, 17:41

त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं... विश्वास बसत नाही ना... मात्र हे खरं आहे... दिल्लीमधील उद्योगी महिमा मेहरा हिनं शेणांपासून कागद बनवून पर्यावरण संरक्षणात एक मोठं योगदान दिलंय.

आजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

Last Updated: Saturday, December 21, 2013, 19:30

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.

कोल्हापूरमध्ये हालहाल करून हत्तीला मारहाण

Last Updated: Saturday, December 7, 2013, 22:42

कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबा डोंगरावर असताना सगळ्याचं लक्ष वेधून घेणारा सुंदर हत्ती सध्या वारणा उद्योग समुहाकडे देखभालीसाठी आहे. मात्र या हत्तीला मारहाण होत असल्याचं उघड झालंय. या हत्तीला अभयारण्यात सोडून देण्यात यावं अशी मागणी पेटा या संस्थेने केलीय.

हत्तीणीच्या भाग्यात न्यायाची `पौर्णिमा` कधी ?

Last Updated: Monday, August 26, 2013, 17:26

पुण्यातली एक हत्तीण गेल्या पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पुण्यातल्या पौर्णिमा हत्तीणीवर अक्षरशः उपासमारीची पाळी आलीय. या हत्तीणीचा मालक पळून गेल्यानं बेवारस झालेल्या या हत्तीणीला कुणीच वालीच उरला नाही.

जखमी `बिजली`चा अखेर मृत्यू!

Last Updated: Sunday, June 30, 2013, 10:33

अखेर बिजली हत्तीणीनं सगळ्यांना अलविदा केलाय. काही दिवसांपासून बिजलीचं वजन अव्वाच्या सव्वा पटीनं वाढलं होतं. तसंच तिची प्रकृतीही खराब झाली होती.

ताडोबात आला नवा पाहुणा!

Last Updated: Sunday, February 17, 2013, 20:47

वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात आता एक नवा पाहुणा आला. व्हेलेंटाईन डेच्याच दिवशी आलेला हा नवा पाहुणा सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या गोंडस लीला आणि त्याची प्रत्येक छबी टिपण्यासाठी पर्यटक ताडोबात गर्दी करत आहेत.

जगभर पसरली 'सुंदर'ची दुर्दशा पसरली

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 17:37

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर इथल्या ‘सुंदर’ हत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ या संस्थेनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सुंदर हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय.

'ख्र्याक'ला फाईट ‘सित्ता’ हत्तीणीची

Last Updated: Thursday, June 7, 2012, 19:11

युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवणाऱ्या युक्रेनच्या ख्र्याक डुक्करला फाईट देणार आहे ती पोलंडची ‘सित्ता’ हत्तीण. सित्तानं चॅम्पियन लीगच्या मॅचेसमध्ये अचूक भविष्य वर्तवलं होतं. त्यामुळे सित्ता कोणाच्या बाजून कौल देते याबाबतही फुटबॉल फॅन्सचं लक्ष्य असणार आहे.

तिची मृत्यूशी झुंज...

Last Updated: Friday, May 11, 2012, 16:27

पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यूशी झुंज देणा-या हत्तीणीला उपचारासाठी जुन्नरच्या वन्यजीव निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. मात्र खेदाची बाब म्हणजे मरणाच्या दारात असलेल्या हत्तीणीची प्रशासनाला माहितीही नव्हती. मात्र काही प्राणीप्रेमी तिची सेवा सुश्रुषा करत होते.

हत्तींवर पडदा, दलित विरोधी!

Last Updated: Monday, January 16, 2012, 09:18

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी निवडणूक आयोगाच्या पुतळे झाकण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची कारवाई सरकारच्या दबावाखाली असून हा आदेश म्हणजे दलित विरोधी मोहीम असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.

हत्ती झाकाण्यासाठी मायावतींची धावपळ

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 15:45

उत्तर प्रदेशात मायावती आणि हत्तींचे पुतळे झाकण्याची जोरदार कारवाई सुरू झाली आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात गेल्या दोन दिवसांपासून टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र या कारवाईला आज वेग आला.