Last Updated: Tuesday, September 17, 2013, 12:37
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भाविकांची स्कॉर्पिओ गाडी रोडरोलरला धडकून भीषण अपघात घडला. कोल्हापुरातल्या शिरोळीजवळ हा अपघात घडला. अपघातात ४ जण जागीच ठार झालेत तर ५ जण जखमी आहेत.
सर्व मृत व्यक्ती आणि जखमी हे मालेगावचे रहिवासी असून ते एकाच कुटुंबातले आहेत. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला निघाले असताना भक्तांवर काळानं घाला घातलाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका तीन वर्षीय मुलाचा समावेश आहे.
रामराव दत्तु शिंदे, नलिनी शिंदे, कविता शिंदे, राज नितीन शिंदे (३ वर्ष) या चार जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 17, 2013, 12:37