Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:47
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरपंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीला उगमापासून ते संगमापर्यंत अनेक ठिकाणी प्रदुषणाचा विळखा पडलाय. त्यामुळं या नदीतील पाणी पिणा-या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलय. या दुषित पाण्यामुळं इचलकरंजी भागातील नागरीकांना कावीळीनं ग्रासल्याची घटनाही ताजी आहे. तरीही कोल्हापूर महानगरपालिका दररोज हजारो लिटर मैला मिश्रीत पाणी पंचगंगा नदीत सोडतेय.. प्रजासत्ताक समाजिक सेवा संघटनेच्या सदस्यानं या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाकडं तक्रार दाखल केली. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं त्याची तत्काळ दखल घेत आय़ुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
महानगरपालीका प्रशासन पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी उपयोजना करण्या ऐवजी ते प्रदूषण वाढवत आहे. त्यामुळं पंचगंगा नदी काठावर वसलेल्या अनेक गावातील ग्रामस्थाचं आरोग्य पुन्हा एकदा धोक्यात आलय. या प्रकरणी कोल्हापूर महानगरपालीकेवर कठोर कारवाई कोण करणार असा प्रश्न या निमीत्तानं उपस्थित झालाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 4, 2013, 21:41