मंत्र्यांचं आश्वासन ठरलं फोल, कोल्हापुरात ‘टोल’फोड!Kolhapur Toll naka todfod

मंत्र्यांचं आश्वासन ठरलं फोल, कोल्हापुरात ‘टोल’फोड!

मंत्र्यांचं आश्वासन ठरलं फोल, कोल्हापुरात ‘टोल’फोड!
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापूरात सुरु असलेले टोल नाके शनिवारी मध्यरात्रीपासून बंद होतील, असं आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्यानंतर टोल विरोधी कृती समीतीच्या सदस्यांनी आमरण उपोषण मागं घेतलं. पण यानंतर सुद्धा कोल्हापूरातील अनेक टोल नाक्यावर आय.आर.बी कंपनीच्यावतीनं टोल वसुली सुरु आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांच्यातून संताप व्यक्त होतोय. टोलवसुली सुरु असल्यानं शिवसैनिकांनी फुलेवाडीचा टोलनाका फोडला आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कालच महापालिकेकडून ५०० कोटी आयआरबीला देऊ असं आश्वासन दिलं होतं. लेखी आश्वासनही देऊन, टोलवसुली रद्द करण्यात येईल, असं सांगण्यात आलं. पण त्यानंतरही आज टोलवसुली सुरु असल्याच्या रागातून शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे.

दुसरीकडे महापालिकेचा म्हणजेच जनतेचा पैसा आयआरबीला का, असा सवाल कोल्हापूरकरांनी विचारला. पण यावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



पाहा व्हिडिओ



First Published: Sunday, January 12, 2014, 12:30


comments powered by Disqus