लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण Lakshman Mane surrender

लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण

लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण
www.24taas.com, सातारा

बलात्काराचे आरोप झालेले उपराकार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले आहेत. तब्बल पंधरा दिवसांनंतर माने सातारा पोलिसांसमोर शरण आले आहेत. आपण फरार नव्हतोच असं माने म्हणाले.

शरण आल्यानंतर मानेंनी आपण निर्दोष असल्याचं म्हटलंय. दोषी असल्यास आपल्याला पुण्यातल्या शनिवारवाड्यासमोर फाशी द्या असंही माने म्हणाले आहेत. आपल्याविरोधात रचलेला हा कट असून आपल्याला अडकवण्यात आले असल्याचा दावा मानेंनी केलाय.


आपण फरार नव्हतोच असा अजब दावाही मानेंनी शरण आल्यानंतर केला. माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेतल्या सहा महिला कर्मचा-यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

First Published: Monday, April 8, 2013, 16:36


comments powered by Disqus