Last Updated: Sunday, April 7, 2013, 12:47
www.24taas.com, सातारा‘उपरा’कार आणि भारतीय भटके विमुक्त विकास संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याविरोधात अत्याचाराची सहावी तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
संबंधित पीडित महिला २००५ पर्यंत जकातवाडीतील आश्रमशाळेत स्वयंपाकीण म्हणून काम करीत होती. दरम्यान, शनिवारी माने यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र सरकार पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली, त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी १०एप्रिल रोजी ठेवली आहे.
जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेत काम करणार्या पाच महिलांनी यापूर्वी मानेंविरोधात अत्याचाराच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. शुक्रवारी रात्री आणखी एका महिलेने तक्रार दिल्याने एकूण सहा गुन्हे मानेंविरोधात दाखल झाले आहेत.
मानेंनी `तू माझ्याशी बायकोप्रमाणे वाग, तुझा पगार वाढवतो, तुला परमनंट करतो,` असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याचे आणि जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतल्याचेही पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
First Published: Sunday, April 7, 2013, 12:47