उर्से टोलजवळ विचित्र अपघात, १२ जखमीLonawla - Near Urse toll bizarre accident happends, 12 injured

उर्से टोलजवळ विचित्र अपघात, १२ जखमी

उर्से टोलजवळ विचित्र अपघात, १२ जखमी
www.24taas.com, झी मीडिया, लोणावळा

मुंबई एक्स्प्रेस-वेवर उर्से टोलनाक्याजवळ रविवारी सायंकाळी चार भरधाव गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झालाय. अपघातातील चौघे अत्यवस्थ असून, ८ जण जखमी झालेत.

गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी चार गाड्यांचा अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला होता. उर्से नाक्यावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ` व्हेरिटो` कारला मागून स्वीफ्ट गाडीची धडक बसली. त्यानंतर `आयआरबी` चे कर्मचारी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू झालं.

त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या इंडिका कारनं मदतकार्य करणाऱ्यांना धडक दिली. त्यानंतर अन्य एका स्वीफ्टनं इंडिकाला धडक दिली. पंधरा मिनिटांच्या अंतरात चारही वाहनं एकमेकांवर आदळली.

मेघा अमित नाईक, अमित मोहन नाईक, शंकर शांताराम घारे, विजय पडवळ, संतोष पांडुरंग घारे, मिलिंद नारायण बगाडे, वीणा मिलिंद बगाडे , अनिल निर्मल, संदीप यादव अशी जखमींची नावं आहेत.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 10:57


comments powered by Disqus