`प्रेम` म्हणजे याहून वेगळं काय असतं हो!, love story of salma & narsh from pimpri chichwad

`प्रेम` म्हणजे याहून वेगळं काय असतं हो!

`प्रेम` म्हणजे याहून वेगळं काय असतं हो!
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

प्रेमाला कशाचंच बंधन नसतं... याचीच प्रचिती पिंपरी-चिंचवडमध्ये आलीय. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एक जोडपं विवाह बंधनात अडकलं. पण, हे लग्न फक्त एवढ्यामुळेच वेगळं ठरत नाही, तर या लग्नामुळे फक्त प्रेमाला नवी ओळख दिलीय.

जगात प्रत्येकासाठी कुणी ना कुणी प्रेमाचं माणूस असतंच... याची पुन्हा एकदा प्रचिती आली ती सलमा आणि नरेशच्या प्रेम कहाणीमुळे... गतिमंद सलमाचं पुढे कसं होणार? या काळजीनं तिची आई तिला रोज भवानीमातेच्या मंदिरात घेऊन जायची. त्याच मंदिराच्या मागे नरेश राहत होता. नरेशही गतिमंद... पण, सलमाला नरेशची आणि नरेशला सलमाची प्रेमाची भाषा समजली. प्रेम म्हणजे काय? हे दोघांनाही माहित नाही कदाचित... पण दोघांनाही एकमेकांच्या सहवासात आनंद मिळू लागला. दोघांच्याही घरच्यांच्या हे लक्षात आलं आणि भवानीमातेच्या साक्षीनंच दोघांचंही लग्न झालं.

सलमा मुस्लीम आणि नरेश हिंदू... पण, नरेश आणि सलमाच्या प्रेमापुढे जाती धर्माची बंधनंही खुजी पडली. महत्त्वाचं म्हणजे दोघांच्या घरच्यांनी समंजसपणा दाखवला आणि लग्नाला लगेचच परवानगी दिली.

लग्न म्हणजे काय हे सलमा आणि नरेशला नीटसं माहीतही नाही. पण दोघांना एकमेकांबरोबर राहायला मिळणार त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. पण ते सत्यात उतरण्यासाठी सलमा आणि नरेश यांच्या कुटुंबीयांसारखे विचार असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

व्हिडिओ पाहा :-



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 27, 2013, 20:36


comments powered by Disqus