Last Updated: Saturday, April 27, 2013, 16:03
www.24taas.com, झी मीडिया, सातारा राज्यातल्या काही भागांना आज मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय. वीज पडून आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, गारांचा पाऊस पडला.
सोलापुरात दोन तर लातूर आणि साता-यात वीज पडून एकेक जणाचा बळी गेलाय. यवतमाळ, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा या जिल्ह्यांना वादळी वा-यासह पावसानं जोरदार झोडपलं. महाबळेश्वर आणि वाई तसंच मिरजमध्ये गारांचा पाऊस पडलाय.
विदर्भात यवतमाळलाही पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. वादळी-वा-यासह गारांचा जोरदार पाऊस झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालीय. सलग तासभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता.
वादळामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्यायत. झाडं आणि विजेचे खांबही उन्मळून पडलेत. वादळी पावसानं उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आंबा, संत्रा आणि चना पिकांना पावसाचा फटका बसलाय.
पाहा गारांच्या पावसाचा व्हिडिओ.....
First Published: Thursday, April 25, 2013, 22:24