Last Updated: Sunday, January 5, 2014, 11:06
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर विवाहितेच्या मृत्यूनंतर कोल्हापुरात तिच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.
कोल्हापुरात रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. विवाहितेच्या मृत्यूनंतर सासर आणि माहेरच्या मंडळींमध्ये हॉस्पिटलच्या आवारातच तुंबळ हाणामारी झाली. कोथली या गावात उज्जवला कांबळे या विवाहितेने विष प्राशन केले होते. त्यानंतर तिला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सासर आणि माहेरच्या मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 5, 2014, 11:06