पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा मार्ग सोपा , metro in pimpri chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा मार्ग सोपा

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा मार्ग सोपा
www.24taas.com, पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी-चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी १६ किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण १५ थांबे असतील.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये संयुक्तपणे मेट्रो प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुणे पालिकेनं मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला होता. शहरातली वाहतूक समस्या लक्षात घेता पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशींनी पालिका भवन ते स्वारगेट, निगडी ते पालिका भवन आणि औंध ते रावेत आणि नाशिक फाटा ते मोशी या मार्गावर प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली.

या संपूर्ण मार्गासाठी एकूण चार हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मार्गासाठी १,१८८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा प्रकल्प फायद्याचा ठरेल असा दावा शिवसेनेचे स्थानिक नेते प्रशांत शितोळे यांनी केलाय. या मार्गासाठी येणा-या एकूण खर्चापैकी ४४ टक्के खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेला करावा लागणार आहे. मात्र, यामुळे वाहतूकीची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे.

First Published: Tuesday, September 25, 2012, 14:08


comments powered by Disqus