Last Updated: Tuesday, August 21, 2012, 07:54
www.24taas.com, पुणे पुण्याच्या गिरी प्रेमी संस्थेच्या बारा वीरांनी १९ मे २०१२ ला एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणेकरांचाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा उर अभिमानानं भरून आला. पण ही मोहीम यशस्वी करतानाचा थरार प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणार आहे एका डॉक्युमेंटरीच्या रुपानं...
पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या या वीरांचा थरार पाहिल्यावर काळजाचे ठोके चुकल्या शिवाय रहाणार नाहीत. या वीरांनी अतुलनीय धाडस दाखवत एव्हरेस्ट सर केलं. सर्वसामान्यांना एव्हरेस्ट मोहीम अतिशय खडतर असल्याची माहिती असली तरी ती किती धोकेदायक आहे, हे अजून समजलेलं नाही. म्हणूनच तो थरार आणि त्यातले धोके या सर्व गोष्टींचा अंदाज यावा यासाठी संस्थेनं या मोहिमेची संपूर्ण माहिती देणारी डॉक्युमेंटरी फिल्म तयार केलीय. येत्या २५ तारखेला ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली जाणारे आहे.
गिर्यारोहण म्हणजे प्रचंड धाडस आणि संयम यांचा कस लागतो. त्याच्यामुळं त्याकडं फार थोडे लोक आकर्षित होतात. हीच संख्या वाढवण्याचा गिरीप्रेमी संस्थेचा प्रयत्न आहे आणि ही फिल्म ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
First Published: Tuesday, August 21, 2012, 07:54