शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांनी उरकलं उद्यानाचं उद्घाटनMNS and Shivsena karyakarte do opening of park

शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांनी उरकलं उद्यानाचं उद्घाटन

शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांनी उरकलं उद्यानाचं उद्घाटन
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना आणि मनसेनं आज अजित पवारांच्या हस्ते उदघाटन होणाऱ्या उद्यानाचं आधीच उदघाटन करून टाकलंय.

मनसेला डावल्यानं नाराज होऊन आधीच हा निर्णय घेण्यात आला. या उद्यानाचं उद्घाटन बाळा नांदगावकर यांच्या हस्ते व्हावं अशी मनसे नेत्यांची मागणी धुडकावल्यानं नाराज होऊन शिवसेनेच्या साथीनं मनसेनं आजच उदघाटन उरकून टाकलं.

यावेळी सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विरोध केला. यावेळी त्यांची पोलिसांसोबत त्यांची झटापटही झाली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Friday, November 22, 2013, 12:36


comments powered by Disqus