ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी, movement of the sugarcane

ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी

ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी
www.24taas.com,सांगली

उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

उसाचा पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तो मान्य केला होता. त्यामुळं दोन शेतक-यांचा बळी घेणारं ऊस आंदोलन संपलं असं वाटत असताना आता ते पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सांगलीत झालेल्या ऊस परिषदेमध्ये २५०० रुपयांचा पहिला हप्ता अमान्य करुन शेतक-यांना एकरकमी 3 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली.

ऊस परिषदेच्या व्यासपिठावर तीन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, रघुनाथ पाटील, सदाभाऊ खोत हे एकत्र आले होते. पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते आणि सध्याचे भाजपाचे नेते पाषा पटेल आणि शिवसनेचे नेते लक्षिमण वडले हेही या परिषदेला उपस्थित होते.

सांगली जिल्हा बंदीमुळे खा. राजू शेट्टी हे या परिषदेला आले नाहीत. शेतकरी संघटनेच्या या नव्या भूमिकेमुळं ऊस आणखी पेटणार अशीच चिन्ह दिसत आहेत.

First Published: Thursday, November 22, 2012, 10:07


comments powered by Disqus