ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी

Last Updated: Thursday, November 22, 2012, 10:07

उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!

Last Updated: Saturday, November 17, 2012, 16:02

ऊस आंदोलनादरम्यान सांगलीत झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणी चंद्रकांत नलावडे या शेतकऱ्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केलाय.

कापसाबाबत निर्णयास विलंब - शरद पवार

Last Updated: Saturday, March 10, 2012, 19:52

कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.