टोल वसुली थांबविण्याचे कोर्टाचे आदेश, Mumbai court orders to stop toll collection in Kolhapur

कोल्हापुरातील टोल वसुली थांबविण्याचे कोर्टाचे आदेश

कोल्हापुरातील टोल वसुली थांबविण्याचे कोर्टाचे आदेश
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापुरात टोलवसुली थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आयआरबी कंपनीला ही मोठी चपराक असल्याचं मानलं जातंय.

कोल्हापूर शहरात सुरू असलेली ही टोलवसूली तातडीने बंद व्हावी यासाठी कोल्हापूरकरांनी मोठं आंदोलन केलं होतं. रस्त्यावर सुरू असलेली ही लढाई न्यायलयातही सुरू होती. त्या लढ्याला यश आलंय.

रस्त्यांची कामं पूर्ण झाली असल्यामुळेच टोलवसुली सुरू असल्याचा दावा आयआरबीने केला होता. कंपनीचा हा दावा न्यायालयाने फेटाळलाय. रस्त्यांची कामं ९५ टक्के पूर्ण झाली नसल्यामुळेच टोलवसूली थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

त्याचबरोबर खर्चाचा आराखडा न करता आयआरबीने टोलवसुली करण्याची घाई केली असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. राज्य सरकारकडून रस्त्यांची कामं पूर्ण झाली असल्याचं प्रमाणपत्र घेऊन या मगच टोलवसुली करा असं न्यायालयाने कंपनीला खडसावलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Friday, February 28, 2014, 08:17


comments powered by Disqus