राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांचे राज्य – मुंडे, munde criticize congress govt.

राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांचे राज्य – मुंडे

राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांचे राज्य – मुंडे

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
राज्यात अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचे राज्य आहे, यांना घरी घालवल्या शिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी सांगलीच्या सभेत व्यक्त केला. मुख्यमंत्री काहीच काम करीत नाहीत हेच मुख्यमंत्री राहू देत आणि आमचे राज्य येवू दे यासाठी गणपतीला साकडे घातलंय, असंही वक्तव्य मुंडे यांनी सांगली महापालिकेच्या प्रचार सभेत केलं.

सांगली आणि मिरजमध्ये झालेल्या दंगलीचा सूत्रधार बागवान हा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. या बागवानच्या मागे जयंत पाटील यांचं पाठबळ असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या सभेत रामदास आठवले यांनीही सत्ताधा-यांवर प्रहार केला.

सोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले
सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...

सोनियांवर बोलण्याची कुवत तरी आहे काय असा सवाल त्यांनी केला... आम्ही टीका केली तर पळता भुई थोडी होईल असा इशारा राणेंनी विरोधकांना दिला... तर सोनिया गांधी आघाडीच्या नेत्या आहेत. त्यांचे नाव काढण्याचा प्रश्नच उदभवत नाही असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी राणेंना दिलंय..


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, July 5, 2013, 17:14


comments powered by Disqus