पिंपरी-चिंचवडमध्ये नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना! Murders in Pimpri- Chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना!

पिंपरी-चिंचवडमध्ये नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना!
कैलाश पुरी, www.24taas.com, पिंपरी चिंचवड

नात्याला आणि मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दोन धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघड झाल्याने शहरवासीय सुन्न झालेत. पिंपरीत पोटच्या मुलानेच वृद्ध मातेचा खून केल्याचं उघड झालंय. तर दुस-या एका घटनेत वडिलोपार्जित मालमत्तेत आजी आपल्याला हवा तो हिस्सा देत नसल्याचा राग मनात धरून नातवानेच ५0 हजारांची सुपारी देऊन आजीचा अपघाती मृत्यू घडवून आणलाय.

कल्पना उर्फ गौरी सुंदरलाल यादव या पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह महिना भरापूर्वी पिंपरीमधल्या राहत्या घरी आढळून आला होता. शवविच्छेदनात त्यांच्या डोक्यात, छातीत आणि बरगडीत गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. त्याच वेळी कल्पना यादव यांचा मुलगा गोपाळ हा गायब असल्याच पोलिसांच्या लक्षात आलं. कर्जबाजारीपणा, देणेक-यांचा पैशांचा तगादा आणि आईच्या आजारपणाचा खर्च...यामुळे संतापलेल्या गोपाळनं आईला जबर मारहाण करून तिची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय.


दुसरीकडे हिंजवडी मध्ये वडिलोपार्जित मालमत्तेत आजी आपल्याला हवा तो हिस्सा देत नसल्याचा राग मनात धरून नातवानेच मोटारचालकाला ५0 हजारांची सुपारी देऊन आजीचा अपघाती मृत्यू घडवून आणल्याची घटना उघड झालीय. हिंजवडी मध्ये सोमवारी शकुंतला लक्ष्मण चव्हाण या ७० वर्षीय महिलेला टाटा सुमो गाडीन उडवलं होत. पोलिसांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचा गुन्हा दाखल केला. पण तपासानंतर एक वेगळच सत्य बाहेर आल. हा अपघात नसून या महिलेच्या नातवानंच तिच्या नावावर असलेली पाच मजली इमारत मिळावी या साठी त्याच्या साडूच्या साहाय्यान महिलेच्या हत्येचा कट रचल्याच समोर आलंय. याप्रकरणी संतोष चव्हाण आणि गणेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पैशांच्या लालसेपोटी नात्याला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही घटनांनी शहरवासीय मात्र सुन्न झाले आहेत....

First Published: Sunday, April 28, 2013, 17:36


comments powered by Disqus