Last Updated: Tuesday, February 11, 2014, 10:59
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूरकेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरी निष्ठा पुन्हा एकदा समोर आलीय. पवार हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरमध्ये बोलत होते.
पवारांना नेते मानण्यास आपल्याला कोणाचीही भीती नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा शिंदे यांनी यापूर्वी व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवर या विधानाला महत्व आहे.
काँग्रेसचे नेते आणि देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखविली आहे. ती काँग्रेसला कितपत रुचेल हा भाग वेगळा आहे. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत, असे धक्कादायक विधान शिंदे यांनी याआधी केले होते.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू होती. त्याचवेळी शिंदे यांनी असे वक्तव्य करून सर्वांनाच दे धक्का दिलाय. पवार पंतप्रधान झाले तर आपल्याला आनंद होईल, असं शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पवार स्तुतीतून काय सिद्ध करायचंय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
पवार यांचा अनुभव बघता ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात. त्यांनी तसे चार वेळा प्रयत्नही केलेत. मात्र, त्यांना यश आलेले नाही. केवळ दिल्लीच्या राजकारणामुळेच पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 10:59