Last Updated: Monday, August 5, 2013, 07:35
www.24taas.com, झी मीडिया, पुणेदेशानं कितीही विकास केला असला तरी आज ही जाती व्यवस्थेच्या पाशातून समाज सुटलेला नाही. आजही समाजातील अनेक घटकांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. पारधी समाज असाच बहिष्कृत… कित्येक पिढ्यांपासून चोर अशीच प्रतिमा झालेला समाज आजही त्या प्रतिमेतून बाहेर पडलेला नाही. या समाजातील व्यक्तीची नाव ही त्याचं वेगळे पण दाखवणारी… कुणी जिलब्या …कुणी इंग्लीश्या …कुणी पिस्तुल्या तर कुणी बंदुक्या ..त्यांची नाव ही सामाजिक विषमतेच दर्शन घडवणारी… पण आता ती बदलली जाणार आहेत.
पारधी समाज.. आजही आपल्या प्रतिमेतून बाहेर आलेला नाही. शिक्षणापासून बहुतांश वंचितच... त्यातच अनेक भ्रामक रूढी परंपरांनी वेढलेला. अशीच एक परंपरा म्हणजे जन्मलेल्या मुलाचं नाव ठेवण्याची… जन्म देताना गरोदर महिलेला जी वस्तू दिसेल त्याचं किंवा ती महिला ज्या ठिकाणी गरोदर होते त्या ठिकाणाचं नाव देण्याची अनोखी पद्धत पारधी समाजात आहे. अशा पध्दतीन जे नाव पडतं त्याच नावानं त्यांना आयुष्यभर समाजात वावरावं लागतं. म्हणूनच कुणी जिलब्या, कुणी इंग्लीश्या, कुणी पिस्तुल्या तर कुणी बंदुक्या असतं.… पण आता अशा व्यक्तींची नाव बदलली जाणारेत. बारामती आणि इंदापूर मधल्या उपविभागीय कार्यालयानं अश्या व्यक्तींची नाव बदलण्याची मोहीम हातात घेतलीय. सरकारच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसादही मिळतोय, नाव बदलून घेण्यासाठी पारधी समाजातील अनेकजण सरसावलेत. नवीन नावांमुळ अनेकांच्या चेहऱ्यावर लपवता येणार नाही एवढं समाधान दिसतंय.
पारधी लोकांच समाजात असलेल स्थान नाव बदलली म्हणून लगेच बदलणार असं नाही. पण किमान त्यांच्यातील बदलासाठीची ही एक सुरुवात आहे अस म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 4, 2013, 19:23