पुण्यात मोदी नमो नम:, Narendra Modi today In Pune, Gujarat police reviewed the security arrangements

पुण्यात मोदी नमो नम:, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा

पुण्यात मोदी नमो नम:, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौ-याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पाटण्यातल्या बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

सुमारे दोन हजार पोलीस तैनात असणार आहेत. याशिवाय गुजरात पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यक्रमस्थळांचा आढावा घेतला आहे. पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. त्यासाठी ते पुण्यात येत आहेत.

दरम्यान, उद्धाघटन होत असलेल्या दिनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीला महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. फक्त हॉस्पिटलच्या तळमजल्यावरील फक्त स्वागत कक्षाला महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. तेही घाई घाईत मिळवलेले दिसतेय. कारण, उद्घाटन १ तारखेला होतेय.

तर तळमजल्यावरील भोगवटा प्रमाणपत्र ३० ओक्टोंबरला देण्यात आले आहे. हॉस्पिटलकडे महापालिकेची विविध करांची ६१ लाखाहून अधिक थकबाकी होती. ती हॉस्पिटलने याच महिन्यात म्हणजे, १८ ओक्टोंबरला भरली आहे. म्हणजे उद्घाटनाला काही दिवस बाकी असताना थकबाकी भरण्यात आली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, November 1, 2013, 11:23


comments powered by Disqus