राष्ट्रवादीच्या नेत्याचाच सरकारला घरचा आहेर NCP leader slam NCP party

राष्ट्रवादीच्या नेत्याचाच सरकारला घरचा आहेर

राष्ट्रवादीच्या नेत्याचाच सरकारला घरचा आहेर
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.

सरकार शेतकरी विरोधी असून जायकवाडी धरणाच्या पाण्याचा विचार करताना दुस-या भागावर अन्याय करतंय, अशी टीका शंकरराव कोल्हेंनी केलीय. जायकवाडीची पाणी साठवण क्षमतेची खोटी आकडेवारी सरकार पुढे करतंय. जर आमचे प्रश्न सुटत नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरू इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी पक्ष आम्ही सोडू असा इशाराही कोल्हेंनीं दिलाय.

या प्रश्नावर जलसंपदा मंत्री तटकरेंना अनेकदा भेटूनही त्यांनी आश्वासन पाळलं नाही. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळ साक्ष देणार आहेत. त्यामुळे हे मंडळ बरखास्त करण्याची मागणी कोल्हे यांनी केली आहे....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 23:45


comments powered by Disqus