Last Updated: Friday, December 13, 2013, 21:20
www.24taas.com, झी मीडिया, पुणेइन्कम टॅक्सच्या बनावट दाखल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्यांची २० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केलीय.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी फेब्रुवारी २०१२मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपल्याकडे इन्कम टॅक्सची थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र त्यांनी निवडणूक विभागाला सादर केलं होतं.
मात्र त्यांनी सादर केलेलं ना हरकत प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप निवडणुकीतील मनसेचे पराभूत उमेदवार समाधान शिंदे यांनी केला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 13, 2013, 21:20