Last Updated: Tuesday, February 25, 2014, 15:54
www.24taas.com, झी मीडिया, सांगलीभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेला दावा खरा करण्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य संजय पाटील यांना फोडण्यात मुंडे यशस्वी झालेत. पाटील हे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. पाटील हे गृहमंत्री आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत.
आपली पक्षात मुस्कटदाबी होत आहे, थेट आरोप आमदार संजय पाटील यांनी केला होता. त्यांची ही नाराजी भाजप प्रवेशाने उघड झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदार पाटील हे भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे मुंडे हे किंगमेकर ठरले आहेत.
डोंबिवली येथील महायुतीच्या सभेत गोपीनाथ मुंडे यांनी आघाडीतील दोन नेते फोडू असे आव्हान दिले होते. राष्ट्रवादीचे एक बडे नेते भाजपमध्ये येणार असल्याची घोषणा मुंडे यांनी विधानसभेच्या आवारातच केली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 25, 2014, 14:28