Last Updated: Monday, February 4, 2013, 22:22
www.24taas.com, कोल्हापूरसाडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचं पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचं आज पुन्हा एकदा उघडकीस आलं. शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्था भेदत दोन रिव्हॉल्व्हर मंदिरात नेऊन सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढलेत.
महालक्ष्मी मंदिर अतिरेक्याच्या हिटलिस्टवर असल्याचं कारण देत पोलीस यंत्रणेनं मंदिराच्या चारीही दरवाज्यासमोर मेटल डिटेक्टर बसवुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. यासाठी एक पोलीस अधिकारी आणि तीसहुन अधिक कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली. पण ही सुरक्षा व्यवस्था किती चोख आहे हे शिवसैनीकांच्या आंदोलनानंतर दिसुन आलय. शिवसैनिकांनी सुरक्षतेचे वाभाडे काढल्यानंतर मंदिर परीसरात भक्तांची कशाप्रकारे लुट होते हेही निदर्शनास आणून दिलं.
त्याचबरोबर याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समीतीला जाबही विचारला. हे आंदोलन कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
First Published: Monday, February 4, 2013, 22:22