कोल्हापूरच्या महालक्ष्मीला ६५ तोळे सुवर्ण अलंकार दान

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 15:04

करवीर निवासीनी महालक्ष्मीला कर्नाटकातील भक्तांकडून ६५तोळे सोन्याचा हार आणि सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. मेकपाटी राजगोपाल रेड्डी, खासदार राजमोहन रेड्डी आणि आमदार चंद्रशेखर रेड्डी यांच्याकडून हार आणि मुकूट देवीला अर्पण करण्यात आला आहे. ६५तोळ्याच्या हाराची किंमत साधारणपणे २०लाख रुपये इतकी आहे.

महालक्ष्मीच्या भक्तांना लाडूचा प्रसाद

Last Updated: Saturday, August 10, 2013, 15:59

तिरुमला तिरुपती देवस्थानतर्फे देण्यात येणा-या लाडू प्रसादाच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांनाही लाडू प्रसाद देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महालक्ष्मीचा हा प्रसाद पोस्टानंही मागवण्याची सोय आहे.त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय.

`महालक्ष्मी`ची सुविधा कुचकामी, शिवसैनिकांनी काढले वाभाडे

Last Updated: Monday, February 4, 2013, 22:22

साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचं पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचं आज पुन्हा एकदा उघडकीस आलं. शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्था भेदत दोन रिव्हालव्हर मंदिरात नेवुन सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढलेत.