क्रीडा संकुलांची दुरवस्था no Grounds in good position

क्रीडा संकुलांची दुरवस्था

क्रीडा संकुलांची दुरवस्था
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमधल्या बहुसंख्य क्रीडा संकुलांची दुरवस्था झाल्यानं खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. शहरातल्या भर वस्तीत असलेलं इनडोअर कुस्ती संकुलही त्याला अपवाद ठरलेलं नाही.

शहरात अनेक क्रीडा संकुल उभारण्यात आली आहेत. दरवर्षी त्यांच्या डागडुजीवर पालिका लाखो रूपये खर्च करते. मात्र शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या या संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची अवस्था पाहून इतर संकुलांची काय स्थिती असेल याची कल्पना करता येते. याच संकुलावर सध्या जिल्हा स्तरीत स्पर्धा सुरू आहेत. मात्र सुविधांच्या अभावी खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय.

क्रीडा संकुलांची देखरेख प्रभाग कार्यालयांकडे सोपवण्यात आलेली आहे. मात्र इथल्या अधिकारी आणि कर्मचा-यांना इतर कामातच रस असल्यानं क्रीडा संकुलांची दुरवस्था झालीय. परिणामी शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकत नसल्याची खंत व्यक्त केली जातेय.

शहरातली क्रीडा संस्कृती जोपासली जावी यासाठी पालिकेनं क्रीडा संकुलांची काळजी घेऊन, खेळाडूंना सुविधा पुरवण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय.

First Published: Saturday, October 6, 2012, 18:53


comments powered by Disqus