Last Updated: Saturday, November 30, 2013, 16:58
www.24taas.com, झी मीडिया, कल्याणइंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानीला दोषी ठरवण्यात आलंय. कल्याण सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय.
याप्रकरणी आज कल्याण सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या पक्षांनी आपली भूमिका मांडली. आता यावर कल्याण सत्र न्यायालयात तीन डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. कलानीसह इतर तिघांना दोषी ठरवण्यात आलंय. कलानीवर हत्येचा कट रचल्याचा तर इतर तिघांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आलाय.
२३ वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्यातले सर्व आरोपी सध्या जामीनावर मुक्त होते. त्यामुळं अखेर उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करत या प्रकरणाचा निकाल ३० नोव्हेंबरपर्यंत देण्याचे आदेश दिले होते. आता तीन डिसेंबरला कोर्ट यावर काय शिक्षा सुनावणार याकडं साऱ्यांचंच लक्ष लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 30, 2013, 16:58