शरद पवारांबाबत कोणीही अफवा पसरवू नयेत- पिचड , Pichad on sharad pawar health

शरद पवारांबाबत कोणीही अफवा पसरवू नयेत- पिचड

शरद पवारांबाबत कोणीही अफवा पसरवू नयेत- पिचड
www.24taas.com, पुणे

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. कोणीही अफवा पसरवू नयेत आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानं शरद पवार यांनी पुण्यात आराम केला आणि सध्या ते बंगळूर, म्हैसूर, उटीच्या दौ-यावर असल्याचंही पिचड यांनी सांगितलं आहे... अशा प्रकारे कोणी जाणूनबुजून अफवा पसरवत असेल, तर ते राज्याच्या संस्कृतीला शोभणार नाही, असं पिचड यांनी म्हटलं आहे.

शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. मार्केट यार्ड येथील सरपंच महापरिषदेत भाषण सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पुण्यात विश्रांती घेतली.


First Published: Thursday, March 28, 2013, 17:20


comments powered by Disqus