Last Updated: Thursday, September 19, 2013, 08:46
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईनरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आलंय. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलीये. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
दरम्यान, दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर आणि इतर अनिंसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची काल भेट घेतली.
केंद्र सराकारनंही जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांच्या बरोबर शरद पवार, प्रकाश करात, सीताराम येचूरी, नितीन गडकरी यांचीही प्रतिनिधी मंडळानं भेट घेतली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 19, 2013, 08:46