Last Updated: Monday, January 14, 2013, 11:49
b>www.24taas.com, पिंपरी- चिंचवड
पिंपरी- चिंचवडमधील दापोडीत एका २३ वर्षांच्या फुलविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. सुमीत घुमे असं या फुलविक्रेत्याचं नाव आहे.
सुमीत याच्यावर कोयत्यानं हल्ला झालाय. जखमी घुमेला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय.
अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतयं. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
First Published: Monday, January 14, 2013, 11:42