Last Updated: Wednesday, April 30, 2014, 18:17
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापूरमध्ये एका भोंदूबाबाचे भांडाफोड करण्यात आले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दीड महिन्याच्या गरोदर महिलांना झाडपाल्याचे आयुर्वेदिक औषध देऊन फसवणूक करण्याचा या भोंदूचा डाव होता.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि अंधश्रद्धी निर्मुलन समिचीचे कार्यकर्ते यांनी पोलिसांच्या मदतीने एक बनावट जोडपे या भोंदूबाबाच्या समोर नेऊन केले. त्यानंतर या भोंदूचा बनाव उघड झाला.
मुलगा होण्यासाठी दीड महिन्याच्या गरोदर महिलांना झाडपाल्याचे आयुर्वेदिक औषध देऊन फसवणूक करणार्या डाव उधळला गेला.
संशयित एस. डी. कुंभार (६५) हा भोंदू आहे. साळोखेनगर ते मोरे-माने नगर परिसरात एस. डी. कुंभार हा वैद्य झाडपाल्याचे आयुर्वेदिक औषध देऊन लोकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार एका नागरिकाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या हेल्पलाइनवर केली होती. त्यानुसार कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांनी या प्रकाराची शहानिशा केली. त्यानंतर सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन या भोंदू वैद्यावर कारवाईची त्यांनी मागणी केली.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या वैद्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या संपूर्ण खोल्यांची झडती घेतली असता लाकडाची साल भरलेली सहा ते सात पोती सापडलीत. त्याचबरोबर प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये औषधाच्या गोळ्या आणि पावडर सापडली. नोंद वही यावेळी मिळाली. त्याने १३ गरोदर महिलांना औषध दिल्याची नोंद या वहीवर होती. पोलिसांनी त्याच्यावर नव्या अंधश्रद्धा कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
हा भोंदू कृषीअधिकारी होता. सेवानवृत्तीनंतर त्याने हा व्यवसाय सुरू केला. मुलीचे मुलात रूपांतर दीड महिन्याच्या गरोदर महिलेच्या पोटात स्त्रीगर्भ असेल तर त्याचे पुरुष गर्भात रूपांतर करण्याचे शक्तिशाली औषध आपल्याकडे आहे.
आपण आतापर्यंत दिलेल्या अनेक महिलांना या औषधाचा गुण आला आहे, अशी जाहिरात तो सर्वत्र करीत असे. त्याच्याकडे मुंबई, पुणे, सातारा, बेळगाव, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी येथील दाम्पत्य येत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 18:17