Last Updated: Saturday, December 15, 2012, 20:29
www.24taas.com, कोल्हापूर, प्रताप नाईककोल्हापूर पोलीस मुख्यालयातल्या पोलीस कॉन्स्टेबलवर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णात कांबळे असं विनयभंग करणाऱ्या आरोपीचं असलेल्या पोलिसाचं नाव आहे. तो कोल्हापूर पोलीस मुख्यालयात तैनात होता.
एका तरुणीला ब्लॅकमेल करुन तिचा विनयभंग केल्याचा कृष्णातवर आरोप आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कृष्णात कांबळे फरार झाला आहे. त्याला निलंबित करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांत महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होतेय. बलात्कार, खून आणि लुटीच्या घटना वाढलेल्या आहेत. गुन्हेगारांकडून महिलांनाच प्रामुख्यानं टार्गेट केलं जातं आहे.
First Published: Saturday, December 15, 2012, 11:15